स्वस्त आणि मस्त... मायक्रोमॅक्सचा ‘कॅनवास टॅब पी ६५०’!

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, September 27, 2013 - 18:58

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
‘मायक्रोमॅक्स’ने नेहमीच स्मार्ट फोनमध्ये फीचर्स आणि किंमतीच्या तुलनेत इतर कंपन्यांना टक्कर दिलीय. आता मायक्रोमॅक्सने कॅनवास ब्रँडमध्ये आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे. ‘कॅनवास टॅब पी ६५०’ नावाच्या या टॅबलेटमध्ये आठ इंचाचे स्क्रीन आहे. हा टॅबलेट अॅपलचा आयपॉड मिनी, सॅमसंग गॅलॅक्सी टॅबलेट थ्रीला किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत चांगली टक्कर देऊ शकतो.
अॅल्यूमिनियम बॉडीत बनलेला कॅनवास टॅब पी ६५० मध्ये आयपीएस डिस्प्ले आहे. मायक्रोमॅक्सच्या म्हणण्यानुसार, यात अॅन्ड्राईड ४.२ (जेली बिन) ऑपरेटिंग सिस्टम आहे, जो अपग्रेडेड वर्जन आहे तसंच ज्याला गूगल भविष्यात आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रयोग करणार आहे. यात १.२ गीगाहर्ट्सन क्वॉडकोरच्या प्रोसेसरसोबत एक जीबीचे रॅम आहे.
भारतात या टॅबलेटची किंमत १६,५०० रुपए आहे. टॅबलेटमध्ये १६ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ३२ जीबी मायक्रोकार्ड एसडीद्वारे वाढवू शकता. यात ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्रंटमध्ये २ मेगापिक्सल शू‍टरचा कॅमेरा आहे. हा टॅबलेटमध्ये वाय-फाय आणि थ्रीजी नेटवर्कसोबत व्हा‌इस कॉलिंग सुविधाही आहे.

यात टॅबलेटमध्ये ४८०० एमएएचची बॅटरी लागलेली आहे. ही बॅटरी पाच तास इंटरनेट ब्राउजिंगचा वेळ देते. या टॅबलेटमध्ये ऑपेरा मिनी, एम लाइवल म्युझिक हम आणि एम सिक्योरिटी सारखे एप्स प्रीलोडेड आहे. मायक्रोमॅक्सला उमेद आहे की सुपीरियर टेक्नॉलॉजी आणि अनमॅच्ड स्टाइल असणारे कॉम्बिनेशन असणारे हे टॅबलेट भारतीय ग्राहकांना नक्कीच पसंत पडेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013 - 18:58
comments powered by Disqus