`नोकिया`साठी `मायक्रोसॉफ्ट` मोजणार ७.२ अरब डॉलर

गेल्या काही वर्षांत ‘नोकिया’नं आपल्या विविध मोबाईलच्या साहाय्यानं ग्राहकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. परंतु, आता मात्र हीच ‘नोकिया’ कंपनी अवघड परिस्थितीतून जात आहे. नोकिया मोबाईल बिझनेस आता विकला जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 3, 2013, 01:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांत ‘नोकिया’नं आपल्या विविध मोबाईलच्या साहाय्यानं ग्राहकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. परंतु, आता मात्र हीच ‘नोकिया’ कंपनी अवघड परिस्थितीतून जात आहे. नोकिया मोबाईल बिझनेस आता विकला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्गज मायक्रोसॉफ्ट मोबाईल कंपनी आता नोकियाचा संपूर्ण मोबाईल बिझनेस आपल्या ताब्यात घेणार आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट तब्बल ७.२ अरब डॉलर (जवळजवळ ४७,२० करोड रुपये) मोजणार आहे.
दोन्ही कंपन्यांनी या करारावर सहमती दर्शवलीय. गेल्या मंगळवारी दोन्ही कंपन्यांनी या कराराला होकार दिलाय.
‘मायक्रोसॉफ्ट’ नोकियाला ‘डिव्हाईसेस’ आणि आणि ‘सर्व्हिसेस’साठी ३.७९७ अरब युरो तसंच पेटंट्ससाठी १.६५ अरब यूरो देणार आहे. नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट दरम्यान यापूर्वी फेब्रुवारी २०११ मध्ये भागीदारीविषयी चर्चा झाली होती. नोकिया आणि मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या या नवीन कराराला मार्च २०१४ च्या अगोदर अंतिम स्वरुप देण्यात येईल.

या करारानुसार, नोकियाचे सगळे पेटेंटस् मायक्रोसॉफ्टला मिळणार आहेत. या कराराची अंमलबजावणी झाल्यानंतर नोकियाचे सध्याचे सीईओ स्टीफेन एलोप हे ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये रुजू होणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.