<b> फिट अॅन्ड फाईन ठेवणारा `फ्युएल बॅन्ड`! </B>

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, October 31, 2013 - 12:17

www.24taas.com, प्रणव पालव, मुंबई
दिवाळीची तयारी सुरु झालीय. फराळाचा आस्वाद हा तर न चुकवण्यासारखीच गोष्ट... पण, हेल्थ कॉन्शिअस असणाऱ्या काही जणांना मात्र हा आस्वाद घेताना सारखी आपल्या आरोग्याची चिंता सतावत असते. यावर उपाय म्हणजे ‘नाईकी’चा हा स्पेशल आणि स्टायलिश ‘फ्युएल बॅन्ड...’
तुमचं वय, वजन काहीही असो, तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल तरी हा बॅन्ड तुम्हाला तुमच्या ‘मॉर्निंग वॉक’पासून ते ‘नाईट आऊटिंग’पर्यंत तुम्हाला मदत करू शकतो. तुमच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेऊन कॅलरीज मोजणं, हार्ट रेट, पल्स रेट मोजण्यापासून तुम्ही दिवसभरात किती पाऊल चाललात, याचीही आकडेवारी हा बॅन्ड तुम्हाला उपलब्ध करून देईल.
‘ब्लू टूथ’च्या साहाय्याने हा बॅन्ड तुम्ही तुमच्या स्मार्टफोनलाही कनेक्ट करू शकता. मग, तुम्ही तुमची दिवसभराची मेहनत तुमच्या मित्रांसोबत शेअरही करू शकतो किंवा त्यांच्या आकडेवारीची तुलनाही करून पाहू शकता.

हातात एखाद्या घड्याळ किंवा रबर बँन्डसारखंच हा बॅन्ड दिसतो. त्यामुळे तुमच्या ‘कूल’लूकमध्ये काहीही फरक पडणार नाही... आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा बॅन्ड चार्ज करण्यासाठी ‘यूएसबी’ची सोय उपलब्ध करून देण्यात आलीय.

'नाईकी फ्युएल बॅन्ड'चे फिचर्स
 तीन आकारांत उपलब्ध : स्मॉल (५.७९ इंच, १४७ मिमी.), मिडीयम/लार्ज (६.७७ इंच, १७२ मिमी.), एक्स्ट्रा-लार्ज (७.७६ इंच, १९७ मिमी)
 यूएसबी चार्जिंग आणि ‘सायझिंग टूल’ची सोय
 लाईट सेन्सॉर - बाहेरील वातावरणातील प्रकाशाच्या मानाने ऑटोमॅटिकली प्रकाश अनुकूलता
 ब्लू टूथ ४.० – स्मार्टफोनला जोडण्यासाठी (फ्युएल बॅन्ड अॅप्लिक्शन आयओएस ६.१ आणि अपडेटेड, आय फोन ४ एस आणि अपडेटेड, आय पॉड टच पाचवा जनरेशन आणि अपडेटेडसाठी)
 लॅपटॉप आणि वेबलाही कनेक्ट करता येऊ शकेल (मॅक ओएसएक्स X व्ही १०.६ आणि अपडेटेड, विंडोज एक्स पी, व्हिएस्टा, ७ आणि ८)
 वॉटर रेसिस्टंट
 वजन – २७ ग्रॅम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Thursday, October 31, 2013 - 08:59


comments powered by Disqus