दर ५ मुलांमागे एका मुलाशी होतोय असभ्य व्यवहार

नुकत्याच झालेल्या एनएसपीसीसीच्या एका सर्वेक्षणातून दर ५ मुलांमागे एक मुलगा इंटरनेटवर धमकी, अश्लील संदेश, अर्वाच्य भाषा यांची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 12, 2013, 06:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
नुकत्याच झालेल्या एनएसपीसीसीच्या एका सर्वेक्षणातून दर ५ मुलांमागे एक मुलगा इंटरनेटवर धमकी, अश्लील संदेश, अर्वाच्य भाषा यांची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे. यांमधील बहुतांश मुलं ही १३ वर्षांखालील असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे.
धमक्या, अर्वाच्य शिव्या, अश्लील फोटो या गोष्टी मुलांसाठी अगदी नित्याच्याच झाल्या आहेत. मुलांना आणि तरुणांना इंटरनेटच्या वापरामुळे अधिकतर कुठल्या स्वरुपाची माहिती मिळते, हे जाणून घेण्यासाठी एनएसपीसीसीचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामधून लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणामही तपासण्यात आला. ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी १४ वर्षीय हन्ना स्मिथ या मुलीचामृतदेह घराच्या गच्चीवर सापडला होता. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मृत्यूपूर्वी तिला काही दिवसांपासून आस्क.कॉम या सोशल नेटवर्किंग साईटवरून अश्लील संदेश येत होते.
अशा प्रकारच्या वेबसाईट्सवर बंदी घालण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. जिथे मुलांसोबत गैरवर्तन केले जाते, अशा वेबसाईट्सवर बहिष्कार घालावा, अशी सूचनाही ब्रिटनचे पंतप्रधान डेवहिड कॅमेरॉन यांनी दिली होती. त्यामुळे जर संस्कारक्षम वयातील मुलगा इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग साईट पाहात असले, तर त्याच्य़ाशी वेळीच गैरवर्तनासंबंधी बोलण्याची वेळी पालकांवर आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.