संपकरी प्राध्यापकांचा पेपर तपासण्याला विरोध

By Jaywant Patil | Last Updated: Monday, April 8, 2013 - 19:44

www.24taas.com, मुंबई
संपकरी प्राध्यापकांनी आणखी एक नवी आडमुठी भूमिका घेतले आहे. प्राध्यापकांनी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी थेट पदवीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे.
एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना इंटर्नलचे 40 मार्क्स देण्यासही प्राध्यापकांनी नकार दिला आहे. याबाबत प्राध्यापकांच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं प्राध्यापक संघटनांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे प्राध्यपकांच्या काही मागण्या मान्य करणा-या सरकारनंही प्राध्यापकांना अजून लेखी आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे सरकारचीही भूमिका नेमकी काय आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

First Published: Monday, April 8, 2013 - 19:44
comments powered by Disqus