खिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, November 13, 2013 - 08:24

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. नुकतंच व्होडाफोननं आपल्या मोबाईल इंटरनेट प्लान्सच्या दरांत कपात केली होती. त्यामुळे आता मोबाईल नेट मार्केटमध्ये युद्ध सुरू झाल्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.
१ नोव्हेंबरपासून व्होडाफोननं आपल्या इंटरनेटच्या किंमतीत 80 टक्क्यांची कपात केली होती. त्या लागोपाठ १५ दिवसांत आयडियानंही आपल्या टू जी इंटरनेट किंमतील केल्याचं जाहीर केलंय. आयडियाची ही कपात येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सध्या तरी हे नवीन दर केवळ सहा महिन्यांसाठीच लागू असतील, असं कंपनीनं जाहीर केलंय.
इंटरनेटच्या दरातील कपात ही प्रीपेड, पोस्टपेड तसंच नव्या आणि सध्याच्या आयडिया ग्राहकांसाठी लागू असणार आहे. आयडियाच्या इंटरनेट दरातील ही कपात आयडियाच्या सर्व टू जी सर्कलमध्ये आणि दहा थ्री जी सर्कलमध्ये उपलब्ध होईल. या नव्या दर कपातीनुसार आयडियाच्या इंटरनेटचे दर टू जी आणि थ्री जी साठी २ पैसे प्रति १०केबी याप्रमाणे आकारले जातील. आयडियाचे देशभरातील २२ सर्कलमध्ये टू जी सेवा पुरवते. सध्याचे आयडियाच्या प्लान्समध्ये टूजीसाठी दोन पैसे प्रति KB आणि थ्रीजी साठी तीन पैसे प्रति १०KB असा दर आकारतं.
आयडिया सेल्युलरकडे सध्या असलेल्या दहा थ्रीजी सर्कलमध्येही ही कपात लागू असल्यामुळे थ्री जी सेवेचा लाभ घेणाऱ्यांच्या मासिक बिलामध्येही तब्बल ३० टक्के कपात होईल, असा दावा कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. आयडिया सेल्युलर सध्या महाराष्ट्र आणि गोवा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ, केरळ, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात थ्री जी सेवा पुरवतं.
काही दिवसांपूर्वी भारती एअरटेलने जून महिन्यातच फक्त पंजाब आणि हरियाणा सर्कलमध्ये ९० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013 - 08:24
comments powered by Disqus