मुलीच्या पँटमध्ये झाला सॅमसंग गॅलेक्सी S3 चा स्फोट

एक मुलीच्या पँटमध्ये स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस३ मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामुळे ती मुलगी जखमी झाली आहे. या मुलीने सॅमसंग विरोधात कोर्टात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 11, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
एक मुलीच्या पँटमध्ये स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस३ मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामुळे ती मुलगी जखमी झाली आहे. या मुलीने सॅमसंग विरोधात कोर्टात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
फॅनी नामक एक स्वीस मुलगी काम करत असताना अचानक तिला फटाका फुटल्याचा आवाज आला. त्यानंतर केमिकलची दुर्गंधीही येऊ लागली. आणि त्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिच्या पँटला आग लागली आहे. ऑफिसमधील तिचे सहकारी तिला वाचवायला पुढे धावले. तोपर्य़ंत आग तिच्या खांद्यापर्यंत पोहोचली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेबद्दल सॅससंग कंपनीला विचारलं असता, सॅमसंगचे प्रवक्ते म्हणाले, “या घटनेची आम्ही सविस्तर तपासणी करू. आमच्या ग्राहकांना कायम उत्तम सेवा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही नेहमीच ग्राहकांना सुरक्षित आणि आनंददायक अनुभव मिळावा यासाठी गुणवत्तेवर लक्ष देतो.”
यापूर्वी अनेकवेळा सॅमसंग गॅलेक्सी एस ३ मोबाइलचा स्फोट झाला आहे. या वर्षी मे महिन्यात अनेक ग्राहकांनी आपल्या सॅमसंग गॅलेक्सी एस ३चा स्फोट झाल्याची तक्रार केली आहे. रात्री अचानक मोबाइलचा स्फोट होऊन संपूर्ण खोलीच धूर झाल्याची माहिती एका ग्राहकाने दिली. अशा प्रखारच्या अनेक घटना घडल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.