`या` मोबाईलचं पहिलं लाँचिंग युरोपआधी भारतात!

पहिल्यादांच युरोप आधी भारतात सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन `एस ५` बाजारात येणार आहे. कंपनी २७ मार्चला `एस ५` फोनची किंमत सुद्धा लाँचिंग सांगणार आहे.

Updated: Mar 25, 2014, 10:37 AM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहिल्यादांच युरोप आधी भारतात सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन `एस ५` बाजारात येणार आहे. कंपनी २७ मार्चला `एस ५` फोनची किंमत सुद्धा लाँचिंग सांगणार आहे. फोनची स्क्रीन ५.१ इंच एचडी आहे आणि एमोएलईडी डिस्पले असल्यामुळं यात फोटो स्पष्ट दिसेल.
२.५ जीएचजेड क्वड-कोअर क्वालकम स्नॅपड्रॅगॉन असून, ८०१ एसओसीवर चालतो. `एस ५` अॅन्ड्रॉईड ४.४ (किटकॅट) ओएसवर आधारित आहे. फोनचे वजन १४५ ग्राम आहे. यामध्ये १६ मेगापिक्सल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे.
फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सल आहे. `एस ५` चार रंगात उपलब्ध आहे. तसंच या फोनमध्ये आरोग्य आणि हार्ट रेट सेंसरसुद्धा आहे. `एस ५` हा जगात सर्वात वेगवान ऑटो फोकस मोबाईल असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.