सुपरफास्ट डाऊनलोड करणारा सॅमसंगचा स्मार्टफोन

कोरियाची कंपनी सॅमसंगने एक नवा स्मार्टफोन सादर केला आहे, सॅमसंग गॅलेक्सी S5 ब्रॉडबॅण्ड एलटीई ए, या फोनचा डिस्प्ले शानदार आहे.

Updated: Jun 18, 2014, 07:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोरियाची कंपनी सॅमसंगने एक नवा स्मार्टफोन सादर केला आहे, सॅमसंग गॅलेक्सी S5 ब्रॉडबॅण्ड एलटीई ए, या फोनचा डिस्प्ले शानदार आहे.
फोनची स्क्रीन 5.1 इंचाची आहे. तर रिझोल्यूशन 2560x1440 पिक्सिल एवढं आहे. जास्त पिक्स्लेल असल्याने, फोटोही अप्रतिम येतात.
हा फोन एलटीई एडवॉन्सला सपोर्ट करतो, या फोनचा डाऊनलोड स्पीड 225 एमबीपीएस इतका आहे, मोठ्या फाईलही एका क्षणात डाऊनलोड होतात. सध्या जगभरात डाऊनलोडचा स्पीड 75 एमबीपीएस आहे.
या फोनचा कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे, यात एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.
फ्रंट कॅमेरा 2.1 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय यात फिंगर स्कॅनर, बायोमॅट्रीक स्क्रीन लॉकिंग फीचर आणि बिल्ट इन हार्ट मॉनिटरही आहे. हा फोन डस्ट आणि वाटर रेझिस्टेंटही आहे.
या फोनची रॅम 3 जीबीची आहे, याची स्टोरेज क्षमता 32 जीबी आहे, ती 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. बॅटरीही दमदार देण्यात आली आहे. 2800 एमएएचची ही बॅटरी आहे.
या फोनची किंमत कोरियात 919 डॉलर आहे, सध्या हा फोन कोरियात उपलब्ध केला जातोय. भारतीय चलनात अंदाजे ही किंमत 55 हजार 340 रूपये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.