सोनीचा वॉटरप्रुफ स्मार्टफोन , Sony launches Xperia Jehd -1 compact waterproof smartphone,

सोनीचा नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन, २० मेगापिक्सल कॅमेरा

सोनीचा नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन, २० मेगापिक्सल कॅमेरा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सोनी नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन वाटरप्रुफ आहे. एक्सपीरिया झेड-१ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनचे फिचरही शानदार आहेत. हा फोन वाटरप्रुफ आहे. या फोनचा कॅमेराही शक्तीशाली आहे. त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये धूम करील, अशी कंपनीला आशा आहे.

एक्सपीरिया Z1 कॉम्पैक्ट लाँच केला आहे. याची किंमत ३६,९९० रूपये आहे. हा मोबाइल फोन क्वाड कोर प्रॉसेसरवर आधारित आहे. तसेच अॅड्रॉईड ही आहे. स्क्रीन ४.३ इंच आहे. तर रिजॉल्युशन १२८० X ७२० पिक्सेल आहे.

या मोबाईलमध्ये २०.७ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच एलईडी फ्लॅश आहे. एफएचडी व्हिडिओही उपलब्ध आहे. याचा पुढचा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. १०८० पी रिजॉल्यूशन व्हिडिओ रिकॉर्डींग करता येऊ शकते. हा फोन पाण्यात पडला तरी घाबरण्याची चिंता नाही. ही फोन 3जी मोबाइल फोन आहे की नाही, याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, ४ जीबी सपोर्ट आहे. याचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे. १८ तास बॅटरी काम करु शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 21:40


comments powered by Disqus