तरुणाई होतेय फेसबुकवरून गायब!

फेसबुक आता प्रत्येकाच्या फोनमध्ये प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्क टॉपवरील सर्वात आवडती साइट म्हणून पाहिले जाते. तरुणाईला भुरळ घालणारी ही साइट आता त्यांच्या पालकांचीही आवडती झाली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 17, 2013, 05:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेसबुक आता प्रत्येकाच्या फोनमध्ये प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्क टॉपवरील सर्वात आवडती साइट म्हणून पाहिले जाते. तरुणाईला भुरळ घालणारी ही साइट आता त्यांच्या पालकांचीही आवडती झाली आहे. त्यामुळे आता किशोरवयीन म्हणजे टीनएजर्स या साइटमधील आपला इंटरेस्ट कमी करताना दिसत आहे.
टीनएजर्सची सर्वाधिक पसंती मिळालेल्या फेसबुकवर पालकवर्ग तसेच तिशीतील युवक-युवतींची गर्दी वाढल्याने टीनएजर्सनी तेथून काढता पाय घेतला आहे. आता टीनएजर्सची सर्वाधिक पसंती ट्विटर आणि व्हॉट्स अपला मिळू लागली आहे.
फेसबुकला बगल देत सध्या युजर्स ट्विटर, इन्स्ट्राग्राम, स्नॅपचॅपसारख्या साईटला अधिक पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. सध्या फेसबुकवर सर्वाधिक युजरबेस असलेल्यांचा वयोगट तिशीतला आहे. फेसबुकसारख्या सोशल साईटवर टीनएजर्स दुरावण्यामागचे कारण पालकांचा सहभाग असल्याचे मायकल मॅक्विन यांचे म्हणणे आहे.
2012 मध्ये टीनएजर्समध्ये फेसबुक ही साईट अव्वल स्थानी होती खरी; पण वर्षभरातच ट्विटरने ही जागा बळकावली आहे. जुन्या पिढीतील युजर्सने २०१०पासून फेसबुक वापरायला सुरुवात केली. आपली मुले फेसबुकवर काय करतात हे तपासून पाहण्याचा हेतू असलेल्या पालकांची संख्या यात मोठी होती.
याशिवाय आपले शाळेतील जुने मित्र जोडण्यासाठी आणि परदेशात वास्तव्यास असलेले मित्र- नातेवाईक यांच्याशी कनेक्ट होण्यासाठीही पालकवर्ग फेसबुक वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सुटीच्या दिवशी लॉग इन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सोशल नेटवर्किंग साईटस्‌बाबत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव समोर आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.