सावधान, फेसबुकवरील मैत्रीमुळे `ती` भरकटली

सोशल साईटची एक धाडसी घटना पुढे आली आहे. मात्र, या घटनेमुळे काहीही होऊ शकले असते. फेसबुक झालेल्या मैत्रीमुळे दहावीमध्ये शिकणारी मुलगी मुंगेरहून बरेलीपर्यंत पोहोचली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2014, 06:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बरेली
सोशल साईटची एक धाडसी घटना पुढे आली आहे. मात्र, या घटनेमुळे काहीही होऊ शकले असते. फेसबुक झालेल्या मैत्रीमुळे दहावीमध्ये शिकणारी मुलगी मुंगेरहून बरेलीपर्यंत पोहोचली.
या मुलीला घरात ओरडा पडल्याने ती खूप नाराज झाली. ती तडक घरातून बाहेर पडली आपल्या फेसबुक मित्राकडे पोहोचली. मात्र, या मित्राने घरी फोन करून याची कल्पना दिली. त्यानंतर घरातील लोकांना याबाबत माहिती समजली. त्या मुलीला घरच्यांकडे सुपूर्द केले. नाहीतर या मुलीवर बाका प्रसंग ओढविण्याची शक्यता नाकरता येत नव्हती.
शहरातील एका महाविद्यालय दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाशी फेसबुकवर मैत्री झाली. मिळाल्या माहितीनुसार दहावीत शिकणारी मुलगी ही अभ्यासात हुशार आहे. तिला वडिलांनी एकस्मार्ट फोन घेऊन दिला. जेणेकरुन तिला इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास विषयक माहिती मिळावी. जवळपास सहा महिन्यांआधी मुलगी नववीत शिकत असताना एका मुलाने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मुलीप्रमाणे नाव असलेला हा मुलगा बरेलीतील होता. मात्र, त्यानंतर ओळख झाल्याने खरी वस्तुस्थिती पुढे आली. दोघांचा चांगला परिचय वाढत गेला. त्या दोघांची मैत्री फुलत गेली.
ही दोघ फोनवर नेहमी व्यस्त असत. त्यावेळी फोन का व्यस्त राहतो, अशी आईने मुलीला विचारले. त्याचवेळी आईने तिला ओरडा भरला. त्यानंतर ती नाराज झाली. या मुलीने फेसबुकवर आपल्या मित्राला मॅसेज पाठवला, की मी तुझ्याकडे येत आहे.
त्यानंतर ती तडक सियालदाह एक्सप्रेसने बनारसला पोहोचली. ती पत्ता शोधत शोदत गोरखपूरला पोहोचली. त्यानंतर मित्राने सांगितल्यानंतर ती हरिद्वार एक्सप्रेस पकडली शनिवारी ती बरेली जंक्शनवर उतरली. त्यावेळी तिचा मित्रा काही मित्रांबरोबर प्लॅटफार्मवर भेटण्यासाठी आला. मात्र, त्या मुलीला आपल्याबरोबर नेण्यास नकार दिला आणि समजूतपणे त्यांने मुलीच्या घरी फोन करून कळविले.
या मुलाचे काही नातेवाईक रेल्वेत असल्याकारणामुळे याची माहिती मिळताच नरमूच्या मंडळ यंत्री वसंत चतुर्वेदी यांना देण्यात आली. त्यानंतर मुलीचे बोलने तिच्या घरच्यांशी करुन दिले. त्यानंतर मुलीला काशीपूरवरून आलेल्या काकांकडे सुपूर्द करण्यात आले. लकडीची अल्लडपणा समजून मुलाला सोडून देण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.