अंतराळात मिळाला पहिला ई-मेल

पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी नुकतंच एक यानं चीननं धाडलंय. या आकाश केंद्र तियांगोंग -१ मध्ये चीनच्या अंतराळवीरांना मंगळवारी पहिल्यांदाच पृथ्वीवरून धाडलेला एक ई-मेल मिळालाय.

Updated: Jun 20, 2012, 02:17 PM IST

www.24taas.com, बिजिंग 

 

पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी नुकतंच चीननं एक यानं अंतराळात धाडलंय. या यानात चीनच्या तीन अंतराळवीरांचा समावेश आहे. आकाश केंद्र तियांगोंग -१ मध्ये या अंतराळवीरांना मंगळवारी पहिल्यांदाच पृथ्वीवरून धाडलेला एक ई-मेल मिळालाय. बिजिंग एरोस्पेस कंट्रोल सेंटरच्या म्हणण्यानुसार, या ई-मेलमध्ये फोटो, व्हिडिओ आणि काही लिखित पाठवली गेली आहेत.

 

पृथ्वीवरून या ई-मेलला पाठवण्यासाठी नियंत्रण केंद्र आणि आकाश केंद्र यांच्यामध्ये असलेल्या एका विशेष संपर्क व्यवस्थेचा वापर करण्यात आला. या संपर्क व्यवस्थेचा वापर अंतराळवीर तात्काळ पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी करू शकतात. त्यामुळे त्यांना गरज असल्यास तात्काळ मदत उपलब्ध केली जाऊ शकते. त्याबरोबरच त्यांचा वेळही वाया जाणार नाही.

 

सोमवारी पहिल्यांदाच, पृथ्वी परिक्रमा करणा-या केंद्रात अंतराळवीरांच्या ३ जणांचा समावेश असलेल्या एका समूहानं प्रवेश केला. या तीन जणांमध्ये एका चीनी महिलेचाही समावेश आहे. ही महिला अंतराळात जाणारी पहिली चिनी महिला ठरलीय. हे अंतराळवीर शेंझो-९ या अंतराळयानातून आकाश केंद्र तियांयोंगमध्ये पोहचलेत.

 

.