ब्लॅकबेरी आलं वठणीवर

लिमिटेड ऍक्सेस देण्याच्या मुद्यावर अखेर ब्लॅकबेरीनं भारत सरकारसमोर नमतं घेतलं आहे. ब्लॅकबेरीनं भारत सरकारला त्यांच्या सर्व्हरचा लिमिटेड ऍक्सेस दिला. ब्लॅकबेरीची ई-मेल आणि ब्लॅकबेरी मेसेंजर या दोन जगभरातील खात्रीशीर सेवा मानल्या जातात. विशेष म्हणजे या दोन्ही सेवा एन्क्रिप्टेड आहेत.

Updated: Oct 29, 2011, 11:51 AM IST

झी २४ तास वेब टीम, दिल्ली

 

अवघ्या कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ब्लॅकबेरी या मोबाईला मात्र भारत सरकारने चपराक लगावताच भानावर आले आहे

 

लिमिटेड ऍक्सेस देण्याच्या मुद्यावर अखेर ब्लॅकबेरीनं भारत सरकारसमोर नमतं घेतलं आहे. ब्लॅकबेरीनं भारत सरकारला त्यांच्या सर्व्हरचा लिमिटेड ऍक्सेस दिला. ब्लॅकबेरीची ई-मेल आणि ब्लॅकबेरी मेसेंजर या दोन जगभरातील खात्रीशीर सेवा मानल्या जातात. विशेष म्हणजे या दोन्ही सेवा एन्क्रिप्टेड आहेत. त्यासाठी खास सॉफ्टवेअर ब्लॅकबेरीनं विकसीत केलं आहे.

 

त्यामुळे ब्लॅकबेरीची सेवा वापरण्यासाठी त्यांचेच मोबाईल वापरावे लागतात. या सेवेकरता ब्लॅकबेरीनं भारतात कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं ई-मेल आणि मेसेंजर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे त्यांच्या सर्व्हरचा ऍक्सेस मागितला होता. ब्लॅकबेरीनं हा मुद्दा ताणून धरला होता. सुरक्षित सेवा आणि ग्राहकांच्या प्रायव्हसीवर बंधनं येणार असल्यानं ब्लॅकबेरीला ही अट मान्य नव्हती. मात्र त्यांची सेवा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर ब्लॅकबेरीनं माघार घेत भारत सरकारला लिमिटेड ऍक्सेस देण्याचं मान्य केलं आहे.