रेल्वेचे `मोबाइल अॅप्स`, क्षणार्धात माहिती

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, April 24, 2014 - 16:07

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. रेल्वे प्रवाशांना आता त्यांच्या स्मार्टफोनवर रेल्वेची माहिती काही क्षणात उलब्ध होणार आहे. कारण रेल्वेने मोबाईल अॅप्स विकसित केले आहे. या नविन अॅप्समुळे तुम्हाला रेल्वेची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
रेल्वे नेमकी किती वाजता येणार किंवा जाणार तसेच गाडी कोणत्या ठिकाणी आहे, याची बिनचूक माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. या अॅप्समुळे प्रवाशांना आपल्या गाडीशी संबंधित माहिती तात्काळ मोबाइलवर मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने हे अॅप्स विंडोज ८ ची सुविधा असणाऱ्या मोबाइल आणि संगणकावर सुरुवातीला वापरता येईल.

हे अॅप्स रेल्वेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केले असून गाडय़ांच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त इतरही माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. याआधी रेल्वे गाडय़ांसंबंधी अथवा आरक्षणासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रवासी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक, रेल्वेचे संकेतस्थळ (www.trainenquiry.com) रेल्वे स्थानकांवरील फलक, चौकशी केंद्र आदींचा वापर केला जातो. त्यात आता मोबाइल अॅप्सची भर पडली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 24, 2014 - 16:07
comments powered by Disqus