इट इज ट्रू, ट्रू-कॉलर अॅप झाले हॅक!

सावधान, तुम्ही तुमच्या मोबाईलवर ट्रू-कॉलर अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा धोक्यात आहे. आपल्याला येणारा अनाहूत फोनचा यूजर कोण आहे, हे समजण्यासाठी अनेकांनी आपल्या फोनमध्ये ट्रू-कॉलर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल आहे

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 23, 2013, 02:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सावधान, तुम्ही तुमच्या मोबाईलवर ट्रू-कॉलर अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा धोक्यात आहे. आपल्याला येणारा अनाहूत फोनचा यूजर कोण आहे, हे समजण्यासाठी अनेकांनी आपल्या फोनमध्ये ट्रू-कॉलर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल आहे. सीरियन इलेक्ट्रॉनिक आर्मी नावाच्या ग्रुपने ट्रू-कॉलर हे सॉप्टवेअर हॅक केले आहे.
या ग्रुपने ट्विटरवरुन हॅक केलेल्या माहितीचा नमुना पोस्ट करून ही माहिती दिली. त्यामुळे १० लाख भारतीयांच्या मोबाईलमधील सर्व डेटा हॅकर्सच्या हाती जाण्याची भीती आहे.
`ट्रू-कॉलर सॉरी. आम्हाला तुमचा डाटाबेस हवा आहे आणि त्यासाठी धन्यवाद` असे ट्विट करुन सीरियन इलेक्ट्रॉनिक आर्मीने हे हॅकिंग जगासमोर आणलं आहे. त्यानंतरच्या ट्विटमध्ये हॅकर्सने ट्रू-कॉलरच्या डेटाबेसचा होस्ट आयडी, युझरनेम आणि पासवर्डही ट्विट करुन हॅकिंगचे पुरावे दिले आहेत.
ट्रू-कॉलर हे अॅप्लिकेशन अॅन्ड्रॉइड, अॅपलच्या आयओएस, विंडोज फोन, ब्लॅकबेरी आणि सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमवरही उपलब्ध आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या अॅपवरील डेटाबेसमधून व्यक्तीच्या फेसबूक, ट्विटर, लिंक्डइन आणि जीमेल खात्यावरुनही इतर युझर्सची माहिती मिळवता येते. त्यामुळे जरी तुम्ही स्वत: ट्रू-कॉलर वापरत नसाल तरी तुमच्या सर्कलमधील लोकांमार्फत तुमच्या माहितीपर्यंत हॅकर्स आरामात पोहोचू शकतील.
ट्रू-कॉलरची वेबसाईट काही काळासाठी बंद पडली होती. मात्र आता ती पुन्हा सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जून महिन्यातच ट्रू-कॉलरने आपल्या अॅपच्या युझर्स संख्येत जानेवारी ते मे महिन्यात १०० टक्क्याने वाढ झाल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी कंपनीने दोन कोटीहून अधिक युझर्स आपले अॅप्लिकेशन वापरत असल्याचा दावा केला होता. त्यापैकी १० लाख युझर्स भारतीय असल्याचे कंपनीने आपल्या अहवालात म्हटले होते.
ट्रू-कॉलरची वेबसाईट वर्ल्डप्रेसच्या जुन्या प्लॅटफॉर्मवर बेस असल्याने अॅडमिन अॅक्सेस मिळाल्याची माहिती सीरियन हॅकिंग आर्मीने दिली. आम्ही फोन डिरेक्टरीतील सर्व्हर हॅक करुन सातहून अधिक मोठे डेटाबेस डाऊनलोड केले आहेत. त्यातील सर्वात मोठा डेटाबेस ४५० जीबीचा असल्याची माहितीही हॅकर्सने ई-हॅकिंग न्यूजशी बोलताना दिली. याआधीही सिरियन इलेक्ट्रॉनिक आर्मीने असोसिएट प्रेस, बीबीसी आणि द ओनियन या जायन्ट साईट्सही हॅक केल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.