होम लोनबरोबर कार लोन फ्री!

कर्ज काढल्याशिवाय घर घेणे आज कठीण झाले आहे. तरीही बँकांमध्ये होम लोन घेण्यासाठी रीघ लागते. आता तर बँकांनीही कर्जपुरवठा अधिक सुरळीत करण्याचे ठरवले आहे. होम लोनसोबत कार लोन मोफत देण्याची योजना बँकांनी सुरू केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2012, 09:54 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

तुम्हाला घरासोबत कार घेणे सोयीचे झाले आहे. कारण होम लोनबरोबर कार लोन फ्री करण्यात आले आहे. त्यासाठी बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. होम लोनसोबत कार लोन मोफत देण्याची योजना बँकांनी सुरू केली आहे.
कर्ज काढल्याशिवाय घर घेणे आज कठीण झाले आहे. तरीही बँकांमध्ये होम लोन घेण्यासाठी रीघ लागते. आता तर बँकांनीही कर्जपुरवठा अधिक सुरळीत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी होम लोनसोबत कार लोन मोफत देण्याची योजना बँकांची आहे. यामध्ये काही बॅंकानी आघाडीही घेतली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, युनायटेड बँक, यूको बँक, यूबीआय या बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यूको बँकेने ‘होम लोनसोबत कार लोन फ्री’ ही योजना सुरू केली आहे.
प्रक्रिया शुल्कही कमी केले नवे घर घेताना नवी गाडीही घ्यावी अशी बहुतांश ग्राहकांची इच्छा असते. त्यांच्यासाठीच ही योजना आणली गेली आहे. अशा ग्राहकांना कार लोनसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, इतकेच नव्हे तर होम लोनवरील प्रक्रिया शुल्कही यूको बँकेने ५० टक्क्यांनी कमी केले आहे.