जगातील पहिला १०० मेगापिक्सेल कॅमेरा

तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होतायत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत.त्यांनी नुकताच एक नवीव कॅमेरा बनवलाय. जगातील पहिला असा कॅमेरा आहे ज्यात आपण १०० मेगापिक्सेलच्या सहाय्याने फोटो काढू शकतो.

Updated: Jul 11, 2013, 12:59 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,बीजिंग
तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत आहेत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत. त्यांनी नुकताच एक नवीन कॅमेरा बनवलाय. १०० मेगापिक्सलचा या कॅमेऱ्यानं जगातील अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.
आत्तापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त किती मेगापिक्सेलचा कॅमेरा बघितलाय? हा नवीन कॅमेरा २० अथवा ३० मेगापिक्सेलचा नसून तर तब्बल १०० मेगापिक्सेलचा आहे. चीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांनी हा १०० मेगापिक्सेलचा हा कॅमेरा तयार केलाय. आयओ-३-कानबान असे या कॅमेऱ्याचे नाव आहे. 'चायना अॅकेडमी ऑफ सायन्स'च्या म्हणण्यानुसार, हा कॅमेरा १०,२४० X १०,२४० पिक्सलचा फोटो क्लिक करु शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कॅमेरा आकाराने फारच लहान म्हणजेच फक्त १९.३ सेंटीमीटरचा आहे. तसेच कमीत कमी शून्य ते २० डिग्री सेल्सिअस तपमान किंवा ५५ डिग्री सेल्सिअससारख्या उच्च तापमानातही फोटो काढू शकतो. चीनच्या एका संस्थेने उत्तम वाहतूक प्रणाली आणि आपत्ती देखरेखसाठी उपयोगात येणारा १०० मेगापिक्सेलचा हा कॅमेरा बनवलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.