9 वर्षाचं झालं youtube, पाहा पहिला व्हिडिओ

यू-ट्यूब शिवाय आज आपण इंटरनेट, स्मार्टफोनची कल्पनाच करू शकत नाही. मात्र यू-ट्यूबला ही प्रगती काही एका दिवसांत नाही तर गेल्या नऊ वर्षात मिळालीय. यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड झाला, त्याला आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 24, 2014, 07:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यू-ट्यूब शिवाय आज आपण इंटरनेट, स्मार्टफोनची कल्पनाच करू शकत नाही. मात्र यू-ट्यूबला ही प्रगती काही एका दिवसांत नाही तर गेल्या नऊ वर्षात मिळालीय. यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड झाला, त्याला आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत.
`Me at the Zoo` नावानं असलेला हा व्हिडिओ यूट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005ला अपलोड केला होता. आतापर्यंत या व्हिडिओला एक कोटी 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.
अवघ्या 19 सेकंदाच्या या व्हिडिओत करीम सॅन डिएगो शहरातील एका प्राणीसंग्रहालयाबाहेर उभा आहे. एका हत्ती समोर उभं राहून ते म्हणतायेत, या प्राण्याची महत्त्त्वाची गोष्ट म्हणजे याची सोंड खूप खूप लांब होते.
2010मध्ये द टोलेडो ब्लेडनं याबद्दल एक संपादकीय छापलं होतं. त्यात सांगण्यात आलं होतं की या व्हिडिओला करीम यांचा शालेय मित्र याकोव लापित्स्कीनं रेकॉर्ड केलं होतं. आता ते टोलेंडो विद्यापीठात केमिकल आणि पर्यावरण इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत.
पाहा यु-ट्यूबवरील पहिला व्हि़डिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.