मुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये

By Surendra Gangan | Last Updated: Friday, September 27, 2013 - 09:20

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील शक्तीमिल गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यामधील जेलमध्ये सापडला आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपी बेपत्ता असल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करता आले नव्हते. त्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली होती.
छायाचित्रकार महिला पत्रकार हिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केल्यानंतर आरोपींना पकडण्यात यश आले. त्यातील एक आरोपी फरार होता. तोनंतर सापडला. मात्र, ज्यावेळी याप्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यावेळी एक आरोपी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यावेळी पोलिसांची धावपळ सुरू झाली. मात्र, हा आरोपी ठाण्यातील जेलमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यावेळी एक यामध्ये नव्हता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीच्यावेळी सत्र न्यायालयात सांगितले की, आरोपी सिराज रहमान खान याच्याबद्दल काही माहिती नाही. दरम्यान, हा आरोपी ठाणे जेलमध्ये कैद करण्यात आला आहे.

दरम्यान, निकम यांनी मीडियाला सांगितले, ठाणे जेल अधिकाऱ्यांनी सिराज रहमान खान हा आपलाकडे नसल्याचे स्पष्ट. तर मुंबई गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले की तो ठाणे जेलमध्ये आहे. त्यानंतर न्यायालयाने ठाणे जेल अधीक्षकांकडे स्पष्टीकरण मागितले. दरम्यानच्या काळात सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, जेलच्या अतिरिक्त महानिदेशक मीरा बोरबनकर यांनी खान बेपत्ता असल्याबाबत इन्कार केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Friday, September 27, 2013 - 09:20


comments powered by Disqus