रत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार

आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2014, 08:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी घेऊन गेल्यानंतर घरी परतत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडिलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील या विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.
संगमेश्वर येथील रिक्षा अपघातात मुलीचा धनश्री प्रवीण कदम हिचा मृत्यू झाला. तर रत्नागिरीतील विचित्र अपघातांत तिचे वडील प्रवीण रामचंद्र कदम आणि आई प्रियांका, एक सहकारी या तिघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झालाय.
धनश्रीच्या रिक्षाला अपघात
खेड येथून आपल्या मुलीची मेडीकल सीईटीची परीक्षा असल्याने तिला घेऊन प्रवीण कदम सकाळी पत्नीसह मुलीला रत्नागिरीला घेऊन आले होते. परीक्षा झाल्यानंतर परतत असताना संगमेश्वरजवळ त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या १७ वर्षांच्या धनश्री मुलीचा मृत्यू झाला.
मुलीचा मृत्यू झाल्याचं आईला सांगितलेलंच नव्हतं
धनश्रीचा मृत्यू झाल्याचं तिची आई प्रियांका कदम हिला सांगितलं गेलं नव्हतं. 'धनश्री जखमी आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवतोय' असं प्रवीण कदम यांच्या मित्रांनी सांगून तिची समजूत काढली होती. तिला मारुती ८००मध्ये बसवले. जिल्हा रुग्णालयातून पानवलपर्यंतचा प्रवास घडला. पुढे मारुतीतून आईवडील प्रवास करत असताना मागून अॅम्ब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जात होता. मात्र, आईला त्याची पुसटशी कल्पना नव्हती आणि पुढे नियतीने धनश्रीच्या आईवडिलांवरही घाला घातला.
मुलीचा मृतदेह नेताना आई-वडिलांवरही काळाचा घाला
तर मुलीच्या मृतदेहाचे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम केल्यानंतर परतत असताना दुर्दैवी मुलीच्या आई-वडिलांच्याही मारुती 800 या गाडीलाही अपघात झाला. पानवलजवळ मारुती गाडी असताना समोरुन एक भरधाव ट्रेलर आला. त्या ट्रेलरवर पोकलेन होता. तो व्यवस्थित बांधण्यात आला नवह्ता. त्यामुळे या भरधाव ट्रेलरमधून हा पोकलेन मारुतती 800 वर येऊन पडला आणि ही गाडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या दुर्घटनेत कारचे दोन तुकडे झाले. या अपघातात प्रवीण कदम आणि प्रियांका कदम या दाम्पत्यासह त्यांच्या नरेश देवरुखकर या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर याच गाडीत असलेले प्रवीण कदम हे थोडक्यासाठी या अपघातातून बचावले, पण ते जखमी झालेत. या विचित्र अपघाताबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण कदम यांच्या पश्चात्य त्यांचे वृद्ध आई-बाबा आणि एक मुलगा आहे. त्यानं नुकतीच दहावीची परीक्षा दिलीय.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close