वसईत बिल्डरची रिव्हॉल्वर - तलवारीनं हत्या, attack on shailendra thakur in vasai

वसईत बिल्डरची रिव्हॉल्वर - तलवारीनं हत्या

वसईत बिल्डरची रिव्हॉल्वर - तलवारीनं हत्या
www.24taas.com, झी मीडिया, वसई

वसईच्या नायगाव जवळील वडवली गावाजवळ बांधकाम व्यावसायिक शैलेश ठाकूर यांची अज्ञात इसमांनी हत्या केलीय. ठाकूर हे माजी सरपंच आणि बहुजन विकास आघाडीचे नेतेही होते.

रविवारी संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान, ३७ वर्षांच्या शैलेश ठाकूरवर रिव्हॉल्वर आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र प्रकाश हिंगोले हाही होता. ठाकूर यांच्या ऑफीसच्या बाहेरचं हा हल्ला करण्यात आला. यामध्ये शैलेश ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला तर साथीदार प्रकाश हंडोरी हा जखमी झालाय.

शैलेश ठाकूर वसई-विरारच्या सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे माजी सरपंच होते. या घटनेमुळे वसई विरारमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, शैलेश ठाकूर यांच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नातलगांना पोलिसांनी सावध राहण्याची सूचना केल्याचे समजतंय.इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 02, 2013, 09:55


comments powered by Disqus