बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन

ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे आणि व्यंग चित्रांचे भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Feb 17, 2013, 10:39 AM IST

www.24taas.com, पालघर
ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे आणि व्यंग चित्रांचे भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथील सदगुरु ग्रुप यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्धाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी शिवसेनेचे खासदार भारतकुमार राउतही उपस्थित होते. ग्रंथ बाळ नावाच्या बाप्पाचा या मथळ्याखाली आयोजित या प्रदर्शनात बाळासाहेबांची शिवतीर्थावरील निवडक भाषणे, समाज प्रबोधनासाठी काढलेली समर्थक व्यंगचित्रे.

राजकिय नेत्यांची व्यंगचित्रातुन उडवलेली खिल्ली,शिवाय महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील भाषणे,चित्रफीती, आणि अनेक दुर्मिळ चित्राचं प्रदर्शन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जनेतेला बाळासाहेबांच्या या दुर्मिळ अश्या गोष्टी पाहाता येणार आहे.