रत्नागिरीत बँक लूटली : बिल्डर निघाला दरोडेखोर

रत्नागिरीतील बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी हा एक व्यावसायिक बिल्डर असल्याचे पुढे आहे. त्याला पोलिसांनी डोंबिवलीचून अटक केली. हा बिल्डर करोडपती असूनही केवळ नाव कमावण्याच्या हौसेपोटी दरोड्याचा मार्ग अवलंबला असल्याचे पुढे आलेय. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2013, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
रत्नागिरीतील बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी हा एक व्यावसायिक बिल्डर असल्याचे पुढे आहे. त्याला पोलिसांनी डोंबिवलीचून अटक केली. हा बिल्डर करोडपती असूनही केवळ नाव कमावण्याच्या हौसेपोटी दरोड्याचा मार्ग अवलंबला असल्याचे पुढे आलेय. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेय.
जाकादेवी येथील सेंट्रल बँकेवर गेल्या महिन्यात पडलेल्या दरोडाप्रकरणी एका आरोपीला मानपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रशांत प्रभाकर शेलार असे याचे नाव असून, तो बांधकाम व्यावसायिक असल्याचे तपासात समोर आले आहे. लाखो रुपयांची दुचाकी वापरण्याचा शौक असलेल्या प्रशांतविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हेही दाखल आहेत.
जाकादेवी येथील सेंट्रल बँकेवर २८ नोव्हेंबर रोजी भरदिवसा दरोडा पडला होता. या धाडसी दरोड्याने रत्नागिरी जिल्हय़ात एकच खळबळ उडाली होती. या दरोड्यात सहभागी तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर डोंबिवली पोलिसांनी प्रशांतचा ताबा रत्नागिरी पोलिसांकडे दिला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यातील दोन आरोपी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे.
प्रशांत हा येथील खंबाळपाडा परिसरातील राहणारा असून, तो बांधकाम व्यावसायिक आहे. तसेच त्याला महागड्या दुचाकी फिरविण्याचा शौक असून, त्याच्याकडे सध्या तब्बल ११ लाखांची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरोडा घटनेचे चित्रण सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. त्यात मिळालेल्या आरोपींची रेखाचित्रे तपासकामी अन्यत्र पोलीस ठाण्यांतही पाठविण्यात आली होती.
यात मानपाडा पोलिसांना मिळालेल्या छायाचित्रातून त्यांच्या पोलीस ठाण्यामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत शेलारचा दरोड्यामध्ये सहभाग असल्याचे आढळले. बुधवारी पहाटे १ च्या सुमारास प्रशांत शेलार या आरोपीला सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसरातून अटक करण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.