डोंबिवलीत केमिकल लोचा, हिरव्या पावसाने डोंबिवलीकर अवाक

डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात आज हिरवा पाऊस पडला, हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून येत होते.

Updated: Jan 21, 2014, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात आज हिरवा पाऊस पडला, हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून येत होते.
अनेकांना हा रंग पाहून हिरवा रंग कुणी टाकला असावा?, असा संशय येत होता. मात्र एमआयडीसी भागात सर्वत्र हा रंग दिसून आला. डोंबिवलीत एमआयडीसीची प्रदुषणाची टक्केवारी कुठपर्यंत गेली आहे, याची कल्पना यावरून येते.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी बोलावण्यात आलं. मात्र रस्त्यावरचं हिरव्या रंगाचं दृश्य पाहून अधिकारीही अवाक झाले आणि काय बोलावं हे अधिकाऱ्यांना कळेनासं झालं. म्हणून अधिकाऱ्यांनी यावर बोलणं टाळलं आहे.
मात्र हिरव्या रंगाचा पाऊस अनेकांना धडकी भरवणारा आहे. वेळीच काही केलं नाही, तर ही परिस्थिती आणखी भयानक होऊ शकते, डोंबिवलीत प्रदुषण नियंत्रणासाठी काय करता येईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.