कोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन

कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2012, 10:39 AM IST

www.24taas.com,दापोली
कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण होऊ लागलेल्या दापोलीत पर्यटकांची वर्दळ वाढतेय. विशेषता कर्धे परिसरातला समुद्र पर्यटकांना खुणावतोय. इथं डॉल्फिनचं दर्शन होऊ लागल्यानं पर्यटकांना वेगळाचं आनंद मिळतोय.
डॉल्फिनची सफर आटोपल्यावर वॉटर स्पोर्टसंचं थ्रीलही पर्यटक अनुभवतायेत. भर समुद्रात स्पीड बोट्सची रायडींग करण्याची मजा काही औरच, अशी प्रतिक्रीया पर्यटक व्यक्त करतात. विशेष म्हणजे महिला पर्यटकही वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटतायेत.
कोकणातले शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षिक करत असतात. त्यातही डॉल्फिनची सफर पर्यटकांसाठी अविस्मरणीय अशीच ठरतेय.