अरे देवा...काय हा शिक्षिकेचा प्रताप, विदयार्थींनीना काय हे करायला लावले?

ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय आहे. पालघर तालुक्यातल्या बोईसर इथल्या एका जिल्हा परिषद शिक्षिका आणि तिच्या पतीनं शाळेतल्या लहान मुलींकडून घरची काम करुन घेण्याची घटना समोर आली आहे. नापास करण्याची धमकी देऊन विदयार्थींनी मूग गिळून काम करीत होत्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 23, 2013, 08:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पालघर
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय आहे. पालघर तालुक्यातल्या बोईसर इथल्या एका जिल्हा परिषद शिक्षिका आणि तिच्या पतीनं शाळेतल्या लहान मुलींकडून घरची काम करुन घेण्याची घटना समोर आली आहे. नापास करण्याची धमकी देऊन विदयार्थींनी मूग गिळून काम करीत होत्या.
याप्रकरणी माधुरी मधुकर संखे आणि तिचा पती मधुकर संखे यांच्या विरोधात ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टनुसार बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या दोघांना जामीनही मंजूर झाला आहे. माधुरी संखे जिल्हा परिशद शाळा सिडको कॉलनी इथलं प्रमुख शिक्षिका म्हणून मागील दोन वर्षांपासून कार्यरत असून त्याचं घर शाळेपासून पाच मिनिटांवर असलेल्या ओस्वाल एम्पायर सोसायटीत आहे. दरम्यान रोज मधल्या सुट्टीत या महाशय शिक्षिका शाळेतल्या तिसरी आणि चौथीच्या मुलींना घरी घेवून जाऊन त्यांच्याकडून झाडू मारणं, धुणी भांडी करून घेणं, बाथरुम साफ करणे, लादी साफ करणे आणि डोक्याचा मसाज करणे अशी कामं करुन घेत असे.
शिवाय याबाबत घरी सांगितलं तर तुम्हाला नापास करु असा दमही या मुलींना मिळत असे. दरम्यान रोजच्या जाचाला कंटाळून त्या दोन्हीही मुलींनी झाला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर हा प्रकार नयना ठाकरे या सामाजिक कार्यकर्तीनं उजेडात आणला. त्यानी याप्रकरणी मुलीच्या बहिणीनं पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनं परीसरात एकच खळबळ उडालीय. शिक्षकीपेशाला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ