कोकण रेल्वे मार्गावर वातानुकूलीत गाड्या

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, October 4, 2012 - 11:59

www.24taas.com,नवी मुंबई
गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करावा लागला होता. तर तीन महिने आधीच तिकिटेही बुक झाली होती. त्यामुळे जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तरीही गर्दी काही आटोक्यात नव्हती. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून हजरत निजामुद्दीन-मडगाव स्थानकांदरम्यान ८ वातानुकूलित हिवाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सुट्टीत कोकण, गोवा आणि उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नेहमीच कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना गर्दी दिसून येते. हिवाळी सुट्टी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्या सहकार्यातून हजरत निजामुद्दीन-मडगाव स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
जादा एक्सप्रेस गाडी हजरत निजामुद्दीन येथून ३, १०, १७, आणि २४ नोव्हेंबरला सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल. मडगावहून ५, १२, १९ आणि २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२५ वाजता सुटतील या गाड्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.२० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचतील.

First Published: Thursday, October 4, 2012 - 11:59
comments powered by Disqus