मनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, August 24, 2013 - 22:24

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृह खात्यावर टीका करत आबांना बांगड्या पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला अनुसरून मनसेनं शुक्रवारी आंदोलन केलं. आपल्या नेत्यांचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाघबीळ नाक्यावर राज यांच्या छायाचित्राला काळं फासण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून आलेल्या मनसैनिकांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.

हमारातुमरीवरून गुद्दागुद्दीवर आलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी अखेर कासारवडवली पोलिसांना मध्यस्थी करावी लागली...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013 - 22:23
comments powered by Disqus