भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार...

बदलापूरचे ज्येष्ठ भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झालाय. त्यांच्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या बाजूला एक गोळी लागलीय. अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर ही घटना घडली.

www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर
बदलापूरचे ज्येष्ठ भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झालाय. त्यांच्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या बाजूला एक गोळी लागलीय. अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर ही घटना घडली.
अज्ञात इसमांनी हा गोळीबार केलाय. म्हात्रे यांना बदलापूरच्या धन्वन्तरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हल्ला होऊन १२ तास उलटले तरी अजूनही हल्लेखोरांचा शोध लागला नाही. पोलीस यंत्रणा झोपली आहे का? असा सवाल सामान्यांमधून विचारला जातोय. दरम्यान, या घटनेनंतर आज बदलापूरात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलाय. भाजपमधील प्रामाणिक नेते आणि ‘मास लिडर’ अशी शरद म्हात्रे यांची ओळख आहे.

बदलापूर परिसरात गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय हेतूनं गोळीबार आणि हत्येच्या घटना वाढतायत. आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत आणि वांगणी येथे शिवसेना नेते रवी पाटील यांची हत्या करण्यात आली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.