कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 3, 2013, 10:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.
यापैकी १२ जणांना केडीएमसीच्या च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर काहीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.admit केले आहेत तर इतर जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याण मधील केडीएमसीच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल असलेल्या या पुरुष महिलांसह लहानग्यांच्या जीवाशी खेळाला केडीएमसीचं आरोग्य विभाग आणि फेरीवाला विभाग जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय.
पावसाळ्यात बाहेरचे, रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, असं डॉक्टर वारंवार सांगतात. तसंच, अनेक आजारांना फेरीवाल्यांकडील पदार्थांमुळे आमंत्रण मिळत असल्याचं दिसून येत आहे. अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेक जण आजारी पडले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.