असहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 10:00

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सहा आरोपींना पोलिसांनी अटकही केलीय. या मुलीच्या गरिबीचा फायदा घेत आरोपी मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार करत होते.
या भागात महिन्याभरातील बलात्कार आणि सेक्स स्कँडल प्रकरणातील हा सातवा गुन्हा आहे.
या अगोदर रत्नागिरीच्या दापोलीमधील `पैशांचा पाऊस` प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. तसेच रत्नागिरी शहरातील सेक्सस्कँडलच्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.
राजापूर पोलीस स्टेशमध्येही बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झालेत तसेच संगमेश्वर तालुक्यातही एका महिलेवर आठ जणांनी बलात्कार केल्याचं प्रकरण ताज आहे. या सगळ्या प्रकारावरून रत्नागिरी जिल्ह्यात सेक्स स्कँडल आणि बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014 - 10:00
comments powered by Disqus