गुहागर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ

By Surendra Gangan | Last Updated: Monday, April 1, 2013 - 13:32

www.24taas.com,गुहागर
गुहागरमधील पहिल्याच नगर पंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ उदयाला आले आहे. या ठिकाणची निवडणूक प्रतिष्ठीत करण्यात आली होती. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ११ जागा जिंकत स्पष्ट विजय मिळविला.
गुहागरमध्ये आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची कसोटी मानली जात होते. या ठिकाणी मतदानाच्यावेळी वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस यांना जोरदार धक्का बसला आहे. भाजपने ६ जागा मिळवत आपले अस्तित्व ठिकविण्याचा प्रयत्न केला आहे.

गुहागरच्या निवडणूक निकालांची उत्सुकता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांनाच असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहनतळांची पक्षनिहाय व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस मैदानामध्ये राष्ट्रवादी, ग्रामदेवता भैरी व्याघ्रांबरी मंदिराजवळ युती, परचुरे कॉम्प्लेक्सग आवारात मनसे आणि इतर सर्वांनी गुहागर नगरपंचायतीशेजारी आपली वाहने उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, देवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये मनसेनेने विजयाचे खाते खोलले आहे. देवरूख ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. देवरूखमधील राजकीय गणिते शिवसेनेने फोल ठरविल पुन्हा सत्ता काबिज केली आहे. शिवसेनेने १२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळविला तर मनसेनेने एक जागा जिंकत खाते खोलले आहे. खासदार नीलेश राणे यांना हा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.

First Published: Monday, April 1, 2013 - 12:11
comments powered by Disqus