कोकणात अतिवृष्टीचा इशारा

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, July 23, 2013 - 11:25

www.24taas.com,झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय. दरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
चिपळूणमधील वाशिष्टी, खेडमधील जगबुडी आणि राजापुरातील अर्जुना नदी तर संगमेश्वरमधील शास्त्री नदीला पूर आला आहे. हवामान खात्यानं पुन्हा एकदा कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे या नदी किनारी गावांना सर्तक राहण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेय.
रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आलाय. या वादळामुळे काही ठिकाणी घरांची पडझड होण्याची शक्यता आहे.

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्यान कोकणातील धबधबे तुडुंब भरून वाहताहेत. पर्यटकही याचा आनंद लुटताय. तर या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलाय. निवसर येथे माती खचण्याचा प्रकार झाल्याने रेल्वेला धोका निर्माण झालाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013 - 10:49
comments powered by Disqus