कोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, July 3, 2013 - 09:03

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलाय. पडत असलेल्या पावसाचा रस्ता वाहतुकीवर परिणाम दिसून आला. मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे पाणी आल्याने रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत वाहतूक खोळंबळी होती. त्यामुळे दोन किलो मीटरपर्यंत दोन्ही बाजुने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, रत्नागिरीत पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर जवळपास ६० घरांत पुराचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. रोहा, संगमेश्वर, पीठढवळत पाणी भरले.

पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोकण रेल्वेवर परिणाम झाला. आरवली स्टेशन दरम्यान सायंकाळी दरड कोसळल्याने माती रूळावर आली. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे रूळावर आलेली दरड बाजुला करण्यात अडथळा येत होता. त्यामुळे १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस या दोन गाड्या रत्नागिरीत चार तास थांबविण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने माती दूर करण्यात यश मिळविल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आलेय.
कोकण रेल्वेचीहेल्पलाईन
दरम्यान, प्रवाशांच्या माहितीसाठी कोकण रेल्वेने हेल्पलाईन सेवा सुरू केलेय. एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या ग्राहकांना १०७२२ तर बाहेरच्या लोकांसाठी ०२२- २७५६१७२१/ २३/ २४ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहे.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, July 3, 2013 - 08:30
comments powered by Disqus