कोकण किनारपट्टीत `हाय अलर्ट` घोषित

कोकण किनारपट्टीत ऐन पावसाळ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. शस्त्रास्त्रांनी भरलेलं जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्यानं संपूर्ण यंत्रणा सज्ज झालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 6, 2013, 06:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
कोकण किनारपट्टीत ऐन पावसाळ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. शस्त्रास्त्रांनी भरलेलं जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्यानं संपूर्ण यंत्रणा सज्ज झालीय. कोकणात समुद्रातल्या हालचालींवर दुर्बिणीच्या सहाय्यानं रात्रंदिवस पहारा ठेवण्यात येतेय.
पाकिस्तानातून शस्त्रांनी भरलेलं एक जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याची माहिती पोलिसांना सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त होताच कोकणातली किनारपट्टी सील करण्यात आलीय. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं समुद्रातली गस्त बंद असते. त्यामुळं लँडिंग पॉईंट निवडून पेट्रोलिंग करण्यात येतेय. किनारपट्टीत नाकेबंदी सुरू करण्यात आलीय. तर किनारपट्टीत 24 तास बंदोबस्त ठेवलाय. किनारपट्टीतल्या नागरिकांनाही अलर्टचा संदेश देण्यात आलाय. तर संशयास्पद हालचालींकडे कस्टम आणि पोलीस नजर ठेवून आहेत.
कोकणात मासेमारी आता बंद झालीय. या पार्श्वभूमीवर समुद्रातली मच्छिमारांची गजबज बंद होईल आणि याचाच फायदा दहशतवादी संघटना उचलण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.