तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलं

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरूनं तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलंय. उल्हासनगरमधल्या शिवाजी चौक या परिसरात ही घटना घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 28, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरूनं तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलंय. उल्हासनगरमधल्या शिवाजी चौक या परिसरात ही घटना घडलीय.
अजित तलरेजा या माथेफिरूनं हे भयानक कृत्य केलंय. अजितनं एका तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तरुणीनं अजितबरोबर लग्नास नकार दिला. याचा राग मनात धरून अजित तलरेजानं या तरुणीच्या चेहऱ्यावर गरम तेल फेकलं. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी अजित तलरेजा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये ही घटना घडलीय. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड व्यक्त करण्यात येतंय. या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याची भीड न राहिल्यामुळे महिलांवरील हल्ले आणि अत्याचारांचे प्रमाण वाढतच चालल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.