कणकवली निवडणूक : राणे, मनसेची प्रतिष्ठा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठीचं मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्योग मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष आहे. तर मनसेने आपले चार उमेदवार रिंगणात उतरविलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com,ओरस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठीचं मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्योग मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष आहे. तर मनसेने आपले चार उमेदवार रिंगणात उतरविलेत.
राणे यांच्या वर्चस्वाला आव्हाण देण्यासाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी झाली आहे. तर मनसे मात्र स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहे. १७ पैकी ४ जागांवर मनसेचे उमेदवार निवडणूक लढवतायत.

कणकवणील्या निवडणुकींना राडेबाजीचा मोठा इतिहास आहे. पण यंदाच्या निवडणुक प्रचारात कोणतीही हिंसक घटना झालेली नाही.
आज होणारे मतदान आणि उद्याची मतमोजणीही शांततेत पार पडावी, यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.