कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, June 6, 2013 - 08:28

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कोकण रेल्वेने मान्सूनसाठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरसाठी लागू असेल.
पावसाळ्यात कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्याचबरोबर गाड्या वेळेवर धावतील याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. या वेळापत्रकानुसार कोकण रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशींनी प्रवासापूर्वी गाडीची वेळ तपासून पाहाण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल्वेच्या मडगाव-सीएसटी मांडवी रेल्वे, सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीम मंगला एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस एक्स्प्रेस, मडगाव-हापा एक्स्प्रेस, मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

वेळा बदलेल्या गाडया
■ १०१०४ मडगाव - सीएसटी मांडवी एक्सप्रेसही गाडी सकाळी ८.३० वाजता सुटेल
■११००४ सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्सप्रेस सायंकाळी ५.३० वाजता
■ १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सुटेल
■ १०११२ मडगाव - सीएसटी कोकणकन्या एक्सप्रेसही सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल
■ १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीम मंगला एक्स्प्रेस सकाळी १०.४५
■ १२६२० मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस दुपारी १२.५०
■ १०११२ मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस १६.४५
■ २२९०७ मडगाव-हापा सकाळी ०७.१५
■ १०२१५ मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस रात्री ९.००
या गाडया पूर्वीच्या वेळेपेक्षा एक ते दीडतास आधी सुटणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013 - 08:20
comments powered by Disqus