कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'

Last Updated: Saturday, September 28, 2013 - 10:41

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक अहमदाबाद आणि मंगलोर दरम्यान १५ डब्यांची एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०९४२० अहमदाबाद - मंगलोर विशेष गाडी १६.१०.२०१३ पासून २७.११.२०१३ पर्यंत प्रत्येक बुधवारी धावेल. दुपारी १६.३५ (४.३५) वाजता अहमदाबादपासून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.४० (७.४०) वाजता मंगलोरला पोहोचेल. १ नोव्हेंबर २०१३ पासून ही गाडी १६.३५ वाजता अहमदाबादपासून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०५ वाजता मंगलोरला येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९४१९ मंगलोर - अहमदाबाद विशेष गाडी, १७.१०.२०१३ पासून २८.११.२०१३ प्रत्येक गुरुवारी धावेल. २२.३० (१०.३०) वाजता मंगलोर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.५० वाजता अहमदाबादला पोहोचेल. १ नोव्हेंबर २०१३ पासून ही गाडी २२.३० (१०.३०) वाजता मंगलोर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.१५ वाजता अहमदाबादला पोहोचेल.
ही विशेष गाडी नांदीयाड, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, वसई, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, प्रेणम, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार या स्थानकांवर थांबेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 27, 2013 - 20:51
comments powered by Disqus