कोकण रेल्वेच्या हुतात्म्यांना मानवंदना

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, October 15, 2013 - 10:02

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेने १४ ऑक्टोबरला कोकण रेल्वे स्मृती दिवसानिमित्ताने रेल्वेच्या निर्मितीच्यावेळी अभियंते आणि कामगारांना आपले प्राण गमवावे लागलेल्यांना मानवंदना दिली. हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कोकण रेल्वे अतिशय खडतर अशा परिस्थितून सुरू झाली. रेल्वे निर्मिती काळापासून रेल्वेला बऱ्याच नैसर्गिक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. या रेल्वे मार्गाची निर्मितीसाठी काम करणाऱ्या अभियंते आणि कामगारांच्या सतत प्रयत्न व जिद्दिमुळे होवू शकली. प्रत्येक यशाची किंमत मोजावी लागते. त्याच प्रमाणे कोकण रेल्वेच्या निर्मितीत व रेल्वे लाईन सुरु झाल्यावर अनेक अभियंते आणि कामगारांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांनी सांगितले.
रेल्वे निर्मित वाटा असणाऱ्या अशा वीर व्यक्तींना मानाचा मुजरा देण्यासाठी प्रत्येक वर्षी १४ ऑक्टोबरला कोकण रेल्वे स्मृती दिवस म्हणून पाळते. या हुतात्म्यांच्या स्मृतीस कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थांकाच्यासमोर `श्रम शक्ती स्मारक` उभारले आहे. हे स्मारक काळ्या ग्रेनाईट दगडापासून बनविले असून त्यावर सर्व हुतात्म्यांची नावे कोरली गेली आहेत. या हुतात्म्यांची नावे असलेले व ज्या परिस्थितीत त्यांना प्राण गमवावे लागले याचा संपूर्ण तपशील `स्मृती पुष्प` या पुस्तकात कोकण रेलवेने प्रसिद्ध केला आहे.
या वर्षी तायल यांनी स्मारकावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली आणि दोन मिनिटाचे मौन पाळले. त्यानंतर आरपीएफने शोक शस्त्र आणि शहीद दिवस परेड करून श्रद्धांजली वाहिली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी भक्ती संगीतद्वारे आपली आद्रांजली वाहिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013 - 10:02
comments powered by Disqus