कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By Surendra Gangan | Last Updated: Monday, May 6, 2013 - 12:09

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पाच ते सहा तास गाड्या लेट आहेत. संगमेश्वर जवळ रूळाला तडे गेल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
कोकण रेल्वेची लांब पल्ल्याची वाहकतूक विस्कळीत झालीये. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत झालीये. रत्नागिरी ते संगमेश्वर मार्गावरील उक्षी बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे गेलेत. त्यामुळं या मार्गावरुन धावणा-या सर्वच रेल्वे गाड्या ५ ते ६ तास उशिरानं धावतायेत.

उष्णतेमुळं रेल्वे रुळांना तडे गेल्याचं सांगण्यात येतय. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेची पथकं घटनास्थळी दाखल झालीयेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्य़े गावाकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

First Published: Monday, May 6, 2013 - 11:30
comments powered by Disqus