करा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

Updated: Jun 6, 2013, 11:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।
कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।

राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावर जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. ‘झी २४ तास’कडूनही महाराजांना हा मानाचा मुजरा....
रायगडावर आज शिवाजी महाराजांचा ३४० वा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने गडावर दाखल झाले आहेत.
`झी २४ तास`कडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.. आपणही करू शकता महाराजांना मानाचा मुजरा... खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा आणि द्या महाराजांना मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करूया...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.