मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, October 10, 2013 - 11:20

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.
सीएसटीकडे स्लो ट्रॅकने जाणारी वाहतूक व्यवस्थापूर्णपणे कोलमडली होती. सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. मध्य रेल्वेवर पेंटोग्राफ तुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अंबरनाथ येथे अशी घटना घडली होती. तर काल कल्याण येथे सिग्नल यंत्रणा बंद पडली.
सातत्याने काहीना काही कारणाने मध्य रेल्वे विस्कळीत होत आहे. आज तिसऱ्या दिवशी पेंटोग्राफ तुटल्याने सेवा ठप्प पडली. रोज `मरे` त्याला कोण रडे, अशी संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केलेय.
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली होती. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झालेत. स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिला.
ठाणे ते कल्याण दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सीएसटीकडील स्लो ट्रॅकवरील वहतूक ठप्पच पडली होती. कर्जत, कसारा आणि अंबरनाथच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. काही गाड्या डोंबिवली येथे थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे डोंबिवली येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013 - 11:20
comments powered by Disqus