पालघर नगरपरिषदेवर मनसे कार्य़कर्ते धडकलेत

ठाणे जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषदेवर आज मनसेनं धडक मोर्चा काढून मुख्याधिका-यांना घेराव घातला. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2013, 08:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषदेवर आज मनसेनं धडक मोर्चा काढून मुख्याधिका-यांना घेराव घातला. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.
पालघर शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते , ठिकठिकाणी असलेले कच-याचं साम्राज्य, शहरात मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा शिवाय प्रदूषण करणा-या कारखांन्यावर कडक कारवाई व्हावी या मागण्यासाठी मनसे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
तर चिटणीस संखेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गणेशकुंड येथून हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्या लवकरात लवकर पुर्ण करावी अशी मागणी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे केलीय. तर मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.