शिवसेना नेते उपरकर मनसेच्या वाटेवर

By Surendra Gangan | Last Updated: Monday, January 7, 2013 - 10:22

www.24taas.com, सावंतवाडी
सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
परशुराम उपरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून ते सहका-यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यांच्या मनसे प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी विनायक राऊत, अरूण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, यांच्या कार्यपद्धतीवर उपरकर नाराज असल्याचं समजतंय.
परशुराम उपरकर आणि त्यांचे सहकारी मनसेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी माहिती माजी जिल्हाप्रमुख अरुण सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.

शिवसेना सोडताना आपणा सर्वांना दु:ख होत आहे; मात्र सद्यःस्थितीत जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या एककल्ली धोरणाला कंटाळून उपरकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी व आपण हा निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात चर्चेला उधाण आले आहे.

First Published: Monday, January 7, 2013 - 09:33
comments powered by Disqus