सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, August 19, 2013 - 18:10

www.24taas.com, सिंधुदुर्ग
सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते. त्यामुळे या सणाचं कोळी बांधवांच्या आयुष्यात मोठं महत्व आहे.
सध्या कोकणात सगळीकडे लगबग सुरु आहे. कोकणताल्या रोजीरोटीचं मुख्य साधन म्हणजे मासेमारी. या मासेमारीवरच या भागातलं अर्थकारण चालतं. साधरण आठ महिने चालणारा हा व्यववसाय जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत बंद असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. तसंच हा माशांचाही प्रजनन काळ असल्यानं या काळात मासेमारी बंद असते.

आता नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नव्या जोमानं मासेमारी सुरु करण्याची लगबग कोकणात सुरु झालीय. कोकणात नारळी पौर्णिमेच्या सणाला ऐतिहासीक महत्व आहे. हा उत्सव आजही तितक्याच परंपरेनं जपला जातो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 19, 2013 - 18:10
comments powered by Disqus