मनसेने काढला शिक्षणमंत्र्यांचा घोटाळा बाहेर

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईतल्या शिक्षण संस्थेतला गोंधळ समोर आलाय. वाशीच्या सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीच्या एका मजल्यावर केवळ 4-5 खोल्यांमध्ये हे कॉलेज सुरू आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 12, 2012, 07:27 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईतल्या शिक्षण संस्थेतला गोंधळ समोर आलाय. वाशीच्या सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीच्या एका मजल्यावर केवळ 4-5 खोल्यांमध्ये हे कॉलेज सुरू आहे.
मात्र मान्यता मिळवण्यासाठी कागदोपत्री संपूर्ण इमारतीची साडेसात हजार चौरस मीटर जागा महाविद्यालयासाठी दाखवण्यात आलीये.
टोपे यांच्या मत्सोधरी शिक्षण संस्थेचं हे वाणिज्य महाविद्यालय २००७ सालापासून सुरू आहे. मनसे विद्यार्थी सेनेनं याविरोधात तक्रार केलीये.
महाविद्यालयात लायब्ररी, जिमखाना, कॅन्टीन आदी सोयींचा आभाव असल्याचं मनसेनं म्हटलंय.