बलात्कार खटल्याचा निकाल दोन महिन्यात

ठाणे सत्र जलदगती न्यायालयात आज एका महत्वपूर्ण खटल्याचा निकाल लागणार आहे. बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं प्रकरण आहे.

Updated: Jun 7, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे सत्र जलदगती न्यायालयात आज एका महत्वपूर्ण खटल्याचा निकाल लागणार आहे. बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं प्रकरण आहे. केवळ दोन महिन्यातच खटल्याचा निकाल लागणार आहे. हे विशेष आहे.
बलात्कार आणि हत्या प्रकरणातील राज्यातीलच नाही तर देशातील हा पहिलाच जलद निकाल लागलेला खटला असणार आहे. २३ जानेवारी २०१३ रोजी कोपरी गावातील पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी २५ जानेवारीला मुलीच्याच चाळीत राहणारा दत्तात्रय रोकडे ह्या ५३ वर्षीय आरोपीला अटक केली होती. याप्रकरणी खटला प्रथम वाशी कोर्टात सुरु होता. मात्र घटनेचे गांभीर्य बघता हा खटला ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला. आज या खटल्याची अंतिम सुनावणी आहे. न्यायमूर्ती टी. एच. माळी यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.