सेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`

सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हात जवळ आला असून टाळी वाजण्याची शक्यता आहे.

प्रशांत जाधव | Updated: Feb 4, 2013, 09:52 AM IST

www.24taas.com, ठाणे
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हात जवळ आला असून टाळी वाजण्याची शक्यता आहे.
त्याला कारण असं की ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सेना-मनसे-भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. याबाबत ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सेना-मनसे-भाजप नेत्यांची बैठक पार पडली.
यामध्ये 13 फेब्रुवारीला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे, त्याबाबत व्यूहरचना करण्यात आलीये. ठाणे जिल्ह्याचं होणारं विभाजन या मुद्यावर सेना-मनसे-भाजप अशी ही युती जमलीये...त्यामुळे आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीची ही नांदी आहे का, याची चर्चा आता सुरू झालीये...